ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी २५ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत वाहतुक बदल लागू केले आहे. दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४ या कालावधीमध्ये हे वाहतुक बदल लागू असतील.
ठाणे शहर तसेच घोडबंदर भागात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप या भागात तुळई बसविली जाणार आहे. त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
हेही वाचा…ठाण्याला वाढीव पाणी मिळण्याची आशा, वाढीव पाणी देण्याबाबत अभ्यास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले
येथील वाहने सेवा रस्त्यावरून वाहतुक करतील. त्यानंतर पुढे मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतुक सुरू होईल. हे वाहतुक बदल २५ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४ यावेळेत लागू असतील अशी माहिती ठाणे वाहतुक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली.