उल्हासनगरः सिंधी बांधवांच्या पवित्र अशा चालिया उत्सवानिमित्त येत्या गुरूवारी उल्हासनगर शहरात कॅम्प एक भागातून हिरा घाटपर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहराच्या विविध रस्त्यांवरची वाहतूक काही तासांसाठी वळवण्यात आली असून अनेक रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी याबाबत आदेश जाहीर करत बदललेल्या वाहतुक मार्गांची आणि पार्किंग मनाईबाबतची माहिती दिली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चालिया पर्वाची सांगता उल्हासनगर शहरात दरवर्षी मिरवणुकीच्या माध्यमातून केली जाते. गुरूवार, २४ ऑगस्ट रोजी उल्हासनगर कॅम्प एक भागातील झुलेलाल मंदिरापासून या मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. साधुबेला चौक, सिरू चौक, नेहरू चौक मार्गे लिंक रस्ता, न्यु इरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवई चौक ते हिराघाट अशी ही मिरवणूक असेल. या मिरवणूक मार्गावर वाहने नेण्यास आणि उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प एक ते तीन दरम्यान पर्यायी वाहतूक झुलेलाल मंदिर मार्ग – भारत चौक – गोल मैदान – तसेच बिलगिट व इतर ठिकाणी जाणारी वाहतूक झुलेलाल चौक येथून खेमाणी, मासळी बाजारमार्गे इच्छित स्थळी जातील. उल्हासनगर वाहतूक उप विभाग समोरील चौक येथून भारत चौक मार्गे खेमाणी धोबीघाट झुलेलाल चौक मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने उल्हासनगर वाहतूक उपविभाग कार्यालय येथून ओटी क्रमांक १ मार्गे बाबा बसंतराम दरबार मच्छी मार्केटमार्गे जातील.
हेही वाचा >>>धक्कादायक! अडीच लाखात विकले १७ दिवसांचे बाळ..;आरोपीमध्ये आईचाही समावेश,वाचा प्रकार काय…
भारत चौकमार्गे गोल मैदान नेहरु चौककडे जाणारी वाहतूक मच्छी मार्केट तसेच बाबा बेफिक्री चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. नेहरु चौकमार्गे शिरु चौक तसेच खेमाणीकडे जाणारी वाहतुक मासळी बाजार, भारत चौक मार्गे जातील. शिवाजी चौकात अंबरनाथ कल्याण रस्त्याने कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने फॉलवर लाईनमार्गे जवाहर हॉटेल – नेहरू चौक गोल मैदान मार्गाने इच्छित स्थळी जातील. तर मधुबन चौक गुरूद्वारा चौक शांतीनगर मार्गे तसेच कल्याण अंबरनाथ रोडने अंबरनाथ दिशेने जाणारी वाहतूक होंडा शोरुम येथे डावे वळण घेवून डॉल्फीन क्लब, गुरुद्वारा चौक इच्छित स्थळी जातील.