ठाणे – ठाण्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल झाले.ठाण्यात बुधवारी सकाळ पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, अंतर्गत रस्ते यामुळे कोंडी झाली आहे. रस्त्यात वाहन बंद पडत आहे. तसेच रस्त्यात खड्डे पडले आहेत.
त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. शहरात अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या रस्त्यात पडल्या. लोकमान्य नगर येथे दोन मोटारींवर वृक्ष कोसळले. यात मोटारींचे नुकसान झाले आहे. घोडबंदर येथे महापालिका रुग्णालयाच्या मीटर बॉक्स मध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.