डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने आठ महिन्यापूर्वी शिळफाटा रस्त्यावरील गावांमध्ये जाणारे ४० हून अधिक पोहच रस्ते रस्ता रोधक उभे करून बंद केले आहेत. या रोधकांमुळे गाव हद्दीत जाणारे किंवा तेथून येणारे वाहन चालक मधल्या मार्गाचा अवलंबून करून शिळफाटा मुख्य रस्त्यावर येतात. काही जण शिळफाटा रस्त्याचे दुभाजक बाजुला करून तेथून वाहने घुसवून इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे शिळफाटा रस्त्यावर पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे.

वाहन चालकाने रस्ता दुभाजकांमधील मधल्या जागेतून दुसऱ्या मार्गिकेत येण्याचा प्रयत्न केला की ते वाहन रस्त्यावर आडवे होऊन मग दुसऱ्या मार्गिकेत येते. तोपर्यंत एका मार्गिकेत या वाहनामुळे कोंडी होते. अनेक वेळा दुभाजकामधून येताना मोटार दुभाजका मधील खोल खड्ड्यात अडकते. हे वाहन अडकले की पुन्हा ते बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

एकीकडे गाव हद्दीत जाणारे पोहच रस्ते वाहतूक विभागाने रस्ता रोधक लावून बंद केले. दुसरीकडे दुभाजकांमधील सिमेंटचे रोधक काढून काही वाहन चालक दुभाजकामधील मोकळ्या जागेतून वाहने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. काही पेट्रोलपंप चालक, ढाबे मालक यांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या सोयासाठी सोयीप्रमाणे रस्ता दुभाजक काढून टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा… भाईंदर : रेल्वेच्या वाढीव मार्गीकेसाठी २०० झाडांवर कुऱ्हाड, रेल्वे प्रशासनाचा महानगरपालिकाकडे प्रस्ताव

अनेक वेळा वाहतूक पोलीस काटई बाजार समिती शुल्क वसुली टपरी जवळ उभे राहून वाहन तपासणी मोहीम हाती घेतात. तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेला रस्ता अरूंद आहे. तेथे अवजड, मोटारी, दुचाकी वाहने एकाचवेळी तपासणीसाठी उभी करून ठेवण्यात येत असल्याने या भागात वाहन कोंडी होते. अनेक वेळा कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस दोन्ही मार्गिकांमधून एक दिशेने जाणारी वाहने सोडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

पलावा चौकातून लोढा हेवन, पलावा गृहसंकुलाकडे जाणाऱ्या वाहनांना आत जाण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील वाहने रोखून धरली जातात. या प्राधान्य क्रमामुळे अलीकडे शिळफाटा रस्ता पुन्हा कोंडीच्या विळख्यात अडकून लागला असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांनी शिळफाटा रस्त्यावर कोंडी होणार नाही यादृष्टीने नियोजन केले आहे. रस्ता दुभाजक बहुतांशी ठिकाणी बंद केले आहेत. दुभाजकांमधून वाहने घुसविणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात आहे असे सांगितले.

Story img Loader