डोंबिवली- डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसरातील सर्वाधिक वर्दळीच्या श्री गणेश मंदिर, स. वा. जोशी शाळेकडे जाणाऱ्या नेहरू रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोटार चालक दिवसभर वाहने उभी करुन ठेवत असल्याने या रस्त्यावर वाहन कोंडी वाढली आहे. नेहरु रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये वाहनतळाची सुविधा नाही. त्यामुळे या भागातील आणि परिसरातील रहिवाशांच्या मोटारी नेहरु रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात येत असल्याचे कळते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, सारस्वत कॉलनी, गणेश मंदिर भागात जाण्यासाठी रिक्षा चालक, पादचारी नेहरु रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर गणेश मंदिराचे छत्रपती शिवाजी उद्यान आहे. याठिकाणी संध्याकाळी अनेक रहिवासी घरातील लहाने मुले घेऊन फिरण्यासाठी येतात. त्यांची वाहने उद्यानाच्या बाहेर उभी असतात. या भागात भेळ-पाणीपुरीच्या हातगाड्या संध्याकाळी चार वाजल्यानंतर उभ्या केल्या जातात. त्यात २५ फूट रुंदीच्या या रस्त्यावर अलीकडे एकाच बाजुला मोटारी उभ्या केल्या जात होत्या. मोटार वाहन प्रशिक्षण शाळेची वाहने येथे उभी असतात. आता या रस्त्याच्या दुतर्फा मोटारी उभ्या केल्या जातात. या भागातील रहिवासी आणि परिसरातील इमारती मधील रहिवाशांना वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध नसल्याने ते रस्त्यावर मिळेल तेथे सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करून ठेवतात, असे या भागातील तक्रारदार रहिवाशांनी सांगितले.

Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा >>> शहापूर : भातसा धरणाच्या कालव्याला भगदाड; लाखो लीटर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

स. वा. जोशी शाळा, ब्लॉसम शाळेत परिसरातून विद्यार्थी शालेय वाहने, रिक्षा, दुचाकी, मोटारीतून येतात. जोशी शाळा ते गणेश मंदिर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या मोटारींमुळे पालकांची कोंडी होते. नेहरु रस्त्यावर गणेश मंदिर ते जोशी शाळे दरम्यान अनेक वर्षापासुनचा टेम्पो वाहनतळ आहे. या वाहनतळामुळे रस्त्याची जागा व्यापते. या वाहनतळाच्या दुसऱ्या बाजुला मोटार चालक वाहने उभी करुन ठेवत आहेत. त्यामुळे ब्लॉसम शाळा ते गणेश मंदिर दरम्यान वाहनांची येजा करण्यासाठी फक्त आठ फुटाचा रस्ता उपलब्ध राहतो. या रस्त्यावर बस, अवजड वाहन आले तर मोठी कोंडी होते. संध्याकाळच्या वेळेत हे प्रकार या भागात अलीकडे वारंवार होऊ लागले आहेत. नेहरु रस्ता हा एकेरी मार्ग आहे. रेल्वे स्थानकाकडून ठाकुर्ली पुलाकडे येण्यासाठी वाहनांसाठी हा रस्ता मुक्त आहे.

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहन कोंडीचा विचार न करता मोटार कार चालक नेहरू रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडे काही जागरुक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. वाहतूक विभागानेही वर्दळीच्या नेहरु रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने कोणी वाहने उभी करत असतील तर त्या वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी पोलीस निरीक्षक गित्ते यांच्या आदेशावरुन वाहतूक पोलिसांनी नेहरु रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली.

हेही वाचा >>> बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा गुरुवारी, शुक्रवारी बंद

रस्ते वाहन कोंडीमुक्त असले पाहिजेत असे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने उचलण्याची जोरदार मोहीम पालिकेने सुरू केली आहे. फ प्रभाग हद्दीतील बहुतांशी वाहने उचलण्यात आली आहेत. नेहरु रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने कोणी वाहन चालक वाहने उभी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाला पत्र देण्यात येणार आहे, असे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले.

“वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने कोणीही वाहन चालकाने वाहने उभे केल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नेहरु रस्त्यावर नियमबाह्यपणे कोणीही वाहने उभी करू नयेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.”

उमेश गित्तेपोलीस निरीक्षक वाहतूक विभाग, डोंबिवली

“ नेहरू रस्त्यासह अन्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाल पत्र देण्यात येणार आहे. वाहतूक विभागाच्या सहकार्याने रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने उचलण्याची मोहीम सुरू आहे.”भरत पाटील- साहाय्यक आयुक्त फ प्रभाग.