शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पत्रीपूल ते लोढा पलावा चौक या नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास चालकांना मज्जाव केला. येते १५ दिवस हा पथदर्शी प्रकल्प या रस्त्यावर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून वाहतूक विभाग यासंदर्भात प्रवासी, नागरिकांच्या हरकती सूचना विचारात घेऊन कायमस्वरुपी निर्णय घेणार आहे.

शिळफाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण करण्यात आल्याने अलीकडे अनेक वाहन चालक या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करुन ठेवतात. ही वाहने अनेक वेळा वाहतुकीला अडथळा ठरतात. हा विचार करुन शिळफाटा रस्त्याच्या पत्रीपूल ते पलावा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी घेतला आहे. पेट्रोल पंप, हाॅटेल्स तेथील वाहनतळ सुविधेचा विचार करुन शिळफाटा रस्त्यावर सम, विषम तारखेप्रमाणे वाहने उभी करण्याची सुविधा देण्याचा विचार वाहतूक विभाग करत आहे. शिळफाटा वाहन कोंडीमुक्त ठेवण्यासाठी हा उपक्रम वाहतूक विभागाने हाती घेतला आहे.

traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त
An amount of 4 crore 33 lakh crores was seized in Talasari police station limits
तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ४ कोटी ३३ लाख कोटींची रक्कम जप्त
pune police return lost mobile sets to citizens on diwali occasion
दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत
pune cops intensify action against drunk drivers
शहरबात : वेगाची ‘नशा’ उतरणार का?

हेही वाचा >>> जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासात क्लस्टरचा अडसर; इमारती धोकादायक झाल्याने रिकाम्या करण्याच्या नोटीसा

मागील तीन ते चार वर्षानंतर प्रथमच प्रवाशांना कोंडीमुक्त शिळफाटा रस्त्याचा अनुभव घेता येत आहे. या रस्त्यावरील वाहतूक गतिमान राहावी. त्यात वाहतूक कोंडीचा खंड पडू नये यादृष्टीने वाहतूक विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून १५ दिवस पत्रीपूल ते पलावा चौक दरम्यान २४ तास दुतर्फा वाहने उभी केली नाहीत तर काय परिणाम होऊ शकतो याचे निरीक्षण या कालावधीत केले जाणार आहे, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मोती मिठाई चौक ते कावेरी चौक दरम्यान अशाच पध्दतीने दुतर्फा वाहने उभी करण्यास चालकांना मज्जाव करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रवासी, स्थानिक नागरिकांना काही सूचना, हरकती घ्यायच्या असल्यास त्यांनी ठाणे वाहतूक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक, प्रवाशांच्या सूचना, हरकती न आल्यास ही अधिसूचना यापुढेही कायम ठेवण्याचा विचार वाहतूक विभाग करणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशी अत्यावश्यक सेवेतील वाहने या उपक्रमातून वगळण्यात आली आहेत, असे डाॅ. राठोड यांनी सांगितले.