देशात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत आपल्या सभांमधून व्हिडीओद्वारे भाजपविरोधात टीकेची झोड उठविणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याची प्रचिती मनसेच्या कार्यकर्त्यांना घेता येणार आहे. ठाण्यातील सभेमध्ये राज ठाकरे हे व्हिडीओद्वारे विरोधकांवर टिकेचे बाण सोडणार असल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे यांची ठाण्यातील सभा गाजण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांची सभा मंगळवारी ठाण्यातील डॉ. मूस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. सभेचे फलक, बॅनर यासह मनसेकडून समाजमाध्यमांवर जारी करण्यात आलेल्या लहान चित्रफीतीचा चांगलाच बोलबाला सुरु आहे. दरम्यान, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये भाजपविरोधात चित्रीकरण दाखवून टिकेची झोड उठवली होती. ठाण्यातील सभेमध्येही अशाचप्रकारे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य पुन्हा एकदा ऐकालया मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
raj thackeray on shivaji park light cut,
पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

दरम्यान राज ठाकरेंच्या सभेमुळे वाहतुकीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत नेमके बदल…

  • ठाणे स्थानक येथून डॉ. मूस चौकातून गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना नौका विहार येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने शिवाजी पथमार्गे जांभळीनाका येथून जातील.
  • टेंभीनाका, टॉवरनाका येथून गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना चिंतामणी चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंतामणी चौक येथून टेंभीनाका, चरईमार्गे जातील.
  • गजानन महाराज चौक येथून राम मारूती रोड, गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राम मारूती रोड मार्गे गोखले रोड येथून जातील.
  • खंडू रांगणेकर चौक येथून गोविंद बच्छाजी मार्गे गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना आम्रपाली हॉटेल येथून वळण घेण्यास प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिटणीस रुग्णालयाकडून जातील.
  • एदुलजी रोड येथून चरई मार्गे गोविंद बच्छाजी मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दगडी शाळा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिटणीस रुग्णालय येथून डावीकडे वळण घेऊन टेंभीनाक्याच्या दिशेने जातील.
  • मुंबईहून सभेसाठी येणाऱ्या बसगाड्या तसंच इतर वाहनांना तीन हात नाका येथे थांबविण्यात येईल. त्यानंतर कार्यकर्त्ये चालत सभास्थानी जातील. तर वाहने आनंदनगर येथील जकातनाका येथे उभी केली जातील.
  • कल्याण डोंबिवली भागातूनही सभेसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असणार आहे. कोर्टनाका येथे वाहन आल्यानंतर कार्यकर्ते वाहनांतून उतरतील. त्यानंतर या बसगाड्या साकेत जवळ उभ्या केल्या जातील. त्यामुळे या कालावधीत कोर्ट नाका आणि तीन हात नाका येथे वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
  • या भागात सायंकाळी होऊ शकते वाहतूक कोंडी
    गोखले रोड, राम मारूती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पथ, टेंभीनाका, तलावपाली परिसर, कोर्ट नाका, कळवा पूल, मुंबई नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, कोपरी पूल, नितीन कंपनी

राज ठाकरे यांच्या आगमनासाठी ठाण्याच्या वेशीवर एक हजार दुचाकी आणि दोनशे चारचाकीची रॅली काढली जाणार होती. परंतु वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने त्यास परवानगी दिलेली नाही.

दरम्यान हे वाहतूक बदल दुपारी ३ ते सभा संपेपर्यंत कायम राहणार आहेत. सभा संध्याकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहे.