कल्याण– शहरातील सर्वच वर्दळीच्या चौकांमध्ये गुरुवारी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीसाठी गुरुवारी सकाळी ११ ते रात्रो १० वाजेपर्यंत शिवाजी चौक, कोळसेवाडी, रामबाग भागातील रस्ते मार्गात बदल केले आहेत.

भिवंडी शहराकडून दुर्गाडी चौक, लालचौकी मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामधील मध्यम स्वरुपाची वाहने दुर्गाडी चौक येथे डावे वळण घेऊन पौर्णिमा चौक येथून इच्छित स्थळी जातील. दुचाकी, चारचाकी हलकी वाहने लालचौकी येथून डावे वळण घेऊन आधारवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण

शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. मध्यम स्वरुपाची वाहने पत्रीपूल येथे डावे वळण घेऊन गोविंदवाडी बाह्य वळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. हलकी वाहने गुरुदेव हाॅटेल येथे उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील गांधीनगर, स्टार कॉलनीमधील रस्त्यांची दुर्दशा, प्रवासी हैराण

मुरबाड रस्ता, इंदिरनगर छेद रस्ता येथून संतोषी माता रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना मधुरिमा स्वीट्स रामबाग गल्ली क्रमांक चार येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने म्हसकर रुग्णालयाकडून इच्छित स्थळी जातील.

मुरबाड रस्त्याने सुभाष रस्तामार्गे शिवाजी चौकात येणाऱ्या वाहनांना, दीपक हाॅटेलकडून महमद अली चौकातून शिवाजी चौकात जाणाऱ्या वाहनांना महमद अली चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने कल्याण रेल्वे स्थानका जवळील वलीपिर रस्त्याने इच्छित स्थळी जातील, असे कल्याण वाहतूक विभागाचे गिरिश बने यांनी सांगितले. गोविंदा पथकांना फडके मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, यशवंतराव चव्हाण मैदान येथे वाहने उभी करण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्ते बंदीचा नियम लागू राहणार नाही, असे वाहतूक उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

Story img Loader