ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी रात्री उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांनी माजिवडा भागातील फ्लाॅवर व्हॅली परिसरातील सेवा रस्ता बंद केला होता. काही पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्याकडेला उभी वाहने उभी केली होती. तसेच रात्री ट्रक, मोठे टेम्पो कॅडबरी चौकातून वळण घेऊन घोडबंदरच्या दिशेने जात असल्याने बुधवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाण्यातील फ्लाॅवर व्हॅली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी रात्री करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थित राहिले होते. त्यामुळे अजित पवार गटाचे ठाण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसांनी येथील सेवा रस्त्याची वाहतूक बंद केली होती. वाहने उभी करण्यास जागा नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाहने मुख्य महामार्गाच्या रस्त्याकडेला उभ्या केल्या होत्या. त्यामुळे महामार्ग अरुंद झाला. तसेच माजीवडा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजिवडा चौकात बंदी केली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत दोन दिवस बदल

त्यामुळे ही वाहने कॅडबरी जंक्शन येथून वळण घेऊन उड्डाणपूल मार्गे वाहतूक करतात. रात्री ट्रक, मोठे टेम्पो ही वाहने कॅडबरी जंक्शन येथे आली होती. तसेच हलक्या वाहनांचीही या मार्गावरून वाहतूक सुरू होती. या सर्व कारणांमुळे नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कॅडबरी जंक्शन ते माजिवडा पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरही वाहनांचा भार वाढल्याने मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या मार्गिकेवर माजिवडा ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे रात्री घरी परतणाऱ्या प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल झाले.