गणेशोत्सवानिमित्ताने खेरदीसाठी नागरिकांची लगबग झालेली आहे. ठाण्यातील जांभळीनाका, स्थानक परिसर, गोखले रोड, नौपाडा या ठिकाणी देखावे, गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. ठाणे पोलिसांकडून नागरिकांना भोंग्याद्वारे गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात होते. बाजारपेठेतील गर्दीमुळे कोर्टनाका, जांभळीनाका, तलावपाली, जीपीओ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने स्थानक परिसरात निघालेल्या नागरिकांचे हाल झाले. दुपारी १ नंतरी वाहतूक कोंडी कायम होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> झटपट श्रीमंत होण्यासाठी अंधश्रध्देतून कासवाची पूजा ; कल्याण पूर्व मधील प्रकार

मागील दोन वर्षे करोनामुळे निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे मागील दोन वर्षांत गणेशोत्सवाच्या कालावधीत बाजारपेठेत निरुत्साही वातावरण होते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून रुग्णसंख्याही घटती आहे. त्यामुळे राज्य सरकारने सण-उत्सवाच्या कालावधीतील करोनावरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे या वर्षी बाजारातही चैतन्याचे वातावरण आहे. गणरायाच्या सजावटीसाठी विविध शोभेच्या वस्तू, देखावे, तोरण बाजारपेठेत आले आहे. त्यामुळे शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट तसेच विविध भागातून नागरिक जांभळीनाका, स्थानक परिसर, गोखले रोड येथील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याने व्यापाऱ्यांनाही हायसे वाटत होते. या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती होऊ नये म्हणून पोलिसांकडूनही भोंग्यांद्वारे नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात होते. तसेच चोरीच्या घटना टाळणयासाठी पोलिसांची काही पथकेही मुख्य चौकात तैनात करण्यात आली होती.

हेही वाचा >>> ठाकुर्ली खंबाळपाडा येथे पादचाऱ्याची रिक्षा चालकासह साथीदारांकडून लूट

बाजारपेठेतील या गर्दीत काही नागरिकांनी त्यांच्या दुचाकी बाजारपेठेत रस्त्याकडेला उभ्या केल्या होत्या. चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गर्दीत भर पडत होती. तर सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना टेंभीनाका, टॉवरनाका मार्गे वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस करत होते. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार येऊन तलावपाली, कोर्टनाका, टेंभीनाका, जांभळीनाका, जीपीओ परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालकांना १० मिनीटांचे अंतर कापण्यासाठी सुमारे २५ मिनीटे लागत होती. त्यामुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.