लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाण्यात मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूकीचा वेग मंदावला असून रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहरातील घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, पूर्णा-भिवंडी मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे हाल झाले आहेत.

ठाण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड मार्गावर कापूरबावडी, वाघबीळ, कासारवडवली भागात कोंडी झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते रांजनोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पूर्णा, कैलास नगर, नारपोली भागतही वाहतूक कोंडी झाली आहे.

Story img Loader