कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पातून उडडाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठीची बांधकाम सामग्री, खोदून ठेवलेले रस्ते त्यामुळे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अरुंद रस्त्यावर अगोदरच वाहनकोंडी होत आहे. त्यात आता मोकळ्या जागेत पोलिसांच्या दुचाकी मोठ्या संख्येने उभ्या करण्यात येत असल्याने या कोंडीने रिक्षा चालक हैराण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कळव्यात अचानक रस्ता खचला; आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाहणी

उड्डाण पुलाच्या कामांमुळे रेल्वे स्थानक भागातून रिक्षा चालकांचे वाहनतळ बदलण्यात आले आहेत. दिलीप कपोते वाहनतळ जमीनदोस्त करुन तेथे पूल उभारणीचे काम सुरू आहे. या वाहनतळावर तीन ते चार हजार दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहत होती. ही वाहने कपोते वाहनतळ तोडल्याने आता रेल्वे स्थानक भागातील अंतर्गत रस्ते, वाहतूक विभागाने निश्चित करुन दिलेल्या रस्त्यावर उभी केली जातात.
रेल्वे स्थानकापासून वाहने उभी करण्याचे रस्ते दूर अंतरावर असल्याने कल्याण परिसरात राहणारे पण मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात नोकरी करणारे बहुतांशी पोलीस आपल्या दुचाकीवर पोलीस लिहिलेल्या दुचाकी रेल्वे स्थानक भागातील रस्त्यावर आणून ठेवतात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर या दुचाकी उभ्या करण्यात येत असल्याने रेल्वे स्थानक भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना पोलीस दुचाकींचा त्रास होत आहे. या दुचाकी रस्त्यावर असल्याने वळण घेताना रिक्षा चालकांना त्रास होतो.

हेही वाचा- चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

रेल्वे स्थानक भागातील इतर सर्व प्रकारची वाहने वाहतूक विभागाने बंद केली आहेत. मग पोलीस ही घुसखोरी का करतात. त्यांच्यावर नियमित कारवाई करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी पोलीस उपायुक्त, वाहतूक उपायुक्तांकडे केली आहे. पोलिसांनी आपल्या वाहनांवर पोलीस असल्याची नामपट्टी लावू नये असे गृहविभागाचे आदेश असताना पोलीस बिनदिक्कत वाहनावर पोलीस नामपट्टी लावत असल्याने रिक्षा संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे.

रेल्वे स्थानक भागात रस्त्यावर दुचाकी उभ्या करणाऱ्या दुचाकींवर यापूर्वी अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. तरीही पोलीस आपल्या दुचाकी त्या ठिकाणी उभे करणे थांबवत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रिक्षा संघटनेकडून करण्यात आली आहे. रेल्वे स्थानका जवळ दुचाकी उभी केली झटपट स्थानकात जाता येते आणि कामावरुन परतल्यावर झटपट घरी निघता येते त्यामुळे पोलीस रेल्वे स्थानकाला खेटून दुचाकी उभ्या करत असल्याचे कळते. वाहनांवर पोलीस लिहिले असल्याने पोलीस त्या वाहनांवर कारवाई करत नाहीत.

हेही वाचा- ठाणे : ऐरोली रेल्वे स्थानकात तरुणावर चाकू हल्ला

पोलिसांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुचाकींवर वाहतूक विभागाने कारवाई केली नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पेणकर यांनी वाहतूक विभाग, पोलिसांना दिला आहे. गेल्या वर्षापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू असल्याने या भागातील रस्ते सकाळपासून वाहन कोंडीत अडकलेले असतात. रेल्वे स्थानक भागात आपणास दुचाकी उभी करता यावी म्हणून इतर सरकारी खात्यात काम करत असलेले काही चलाख कर्मचारी आपल्या वाहनावर पोलीस लिहून रेल्वे स्थानक भागात दुचाकी उभ्या करत असल्याचे समजते.

हेही वाचा- त्या’ दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे कोपरी दौऱ्यादरम्यान आदेश

कल्याण रेल्वे स्थानक भागात पोलिसांच्या दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. या दुचाकींवर वाहतूक विभागाने कारवाई केली नाहीतर रिक्षाचालक आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam due to the parking of two wheelers by the police in the open space near kalyan west railway station thane news dpj
Show comments