ठाणे – घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी सकाळी वाहन बंद पडल्याने गायमुख ते भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे गुजरात, वसई, भाईंदर भागातून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत. गायमुख येथे सकाळी अवजड वाहन बंद पडले. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर झाला.
हेही वाचा >>> शहापूर: धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू
गायमुख ते भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतूक करत होते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. वसई भागातून अनेक वाहन चालक ठाणे शहरात कामानिमित्ताने येत असतात. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या २० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत होता.