ठाणे : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसला. सॅटिस पुलावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. शाळेच्या बसगड्याही काही काळ कोंडीत अडकल्या होत्या.

हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये ३२ गुन्हे दाखल असलेले घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप तक्रार नोंदवून घेतलेली नसून त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण, ते कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

हेही वाचा >>> “गुंडांचं सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही..” आदित्य ठाकरेंची ठाण्यात गर्जना

ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ते ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी दुपारपासून शिवाजी मैदान परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमत होते. तर, काँग्रेसचे कार्यकर्ते परिसरातच असलेल्या जिल्हा कार्यालयात जमले होते. शिवाजी मैदान परिसरात बसगाड्या आणि वाहनांमधून जथ्थे येत होते. यामुळे जांभळी नाका चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. त्याचा परिणाम तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला. त्यानंतर शिवाजी मैदान, जिल्हा परीषद कार्यालय, बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिखाधिकारि कार्यालय, आनंद दिघे शक्तीस्थळ असा मोर्चा निघाला. यात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्याचवेळेत याच परिसरातील शाळाही सुटल्या आणि या मुलांच्या शाळेच्या बसगड्याही काही काळ कोंडीत अडकल्या होत्या. काही ठिकाणी मोर्चाच्या मार्गावर वाहतूक रोखून धरली नाही आणि या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळवली नाही. वाहतूक पोलिसांच्या या नियोजन अभावामुळेही काही ठिकाणी कोंडी झाल्याचे दिसून आले.

Story img Loader