ठाणे – घोडबंदर मार्गावर वाहन बंद पडल्याने मंगळवारी रात्री मानपाडा ते तीन हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून घोडबंदर आणि घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना पाऊण तास लागत होता. रात्री उशिरापर्यंत येथील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या दारुड्याला चोप

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मर्गिकेवर मंगळवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास एक डंपर बंद पडला. त्यामुळे मानपाडा ते तीन हात नाका अशा सुमारे सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईहून अनेकजण घोडबंदर किंवा ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असतात. नोकरदारांच्या वाहनांची संख्याही रात्री अधिक असते. त्यामुळे रात्री कामाहून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता.