ठाणे, कल्याण, बदलापूर : उपनगरीय रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा ताण आल्याने अनेकजण सुरक्षित प्रवासासाठी किंवा अंतर्गत प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला प्राधान्य देतात. परंतु गेल्याकाही दिवसांपासून खड्डे, वाहतुक बदल आणि पोलिसांकडून अपुरे नियोजन यामुळे जिल्ह्यात काही भाग आता कोंडीचे केंद्रबिंदू बनू लागले आहे. दररोज पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर ते कॅडबरी जंक्शन, घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा ते गायमुख, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते आता कोंडीचे आगार झाले आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांपासून जवळचा जिल्हा असल्याने ठाणे जिल्ह्यात नोकरदार, सरकारी अधिकारी आणि व्यवसायिक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रामुख्याने ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ अधिक असते. तसेच उरण जेएनपीटी आणि भिवंडी भागातून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुकही होत असते. तसेच शहरांमध्ये अंतर्गत वाहतुकही मोठ्याप्रमामात होते. परंतु मागील काही दिवसांपासून सर्वच शहरांना कोंडीचे ग्रहण लागले आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अपुऱ्या उपाययोजना, वाहतुक बदल आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे कोंडीचा नाहक मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागला आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत परवानगी आहे. असे असतानाही अनेक अवजड वाहनांचा शहरात प्रवेश होत असतो. असे असताना पोलीस फक्त कारवाईमध्ये व्यस्त असतात. असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे.

Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Stones pelted at hawker removal teams vehicle in G ward of Dombivli
डोंबिवलीत ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या वाहनावर दगडफेक
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Traffic changes in Yerwada area on the occasion of Army Day procession
सेना दिन संचलनानिमित्त येरवडा भागात वाहतूक बदल
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
Vishalgad opens for tourists after five months
तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला

हेही वाचा – Overhead Wire Break: मध्य रेल्वे लोकल सेवा विस्कळीतच, ठाकुर्ली जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याचा परिणाम रात्रीपर्यंत कायम

जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रातील काही रस्ते आता कोंडीचे आगार होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
घोडबंदर- घोडबंदर मार्गावरील गायमुख ते भाईंदरपाडा या भागात दररोज वाहतुक कोंडी होत असते. असे असताना येथील ओवळा, आनंदनगर भागात वाहतुक पोलीस इ- चलान कारवाई करण्यात व्यस्त असतात. या मार्गावरून जड अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतुक होत असते. परंतु नियोजन शून्य असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.

कोपरी आनंदनगर ते कॅडबरी – पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी आनंद नगर ते कॅडबरी जंक्शनपर्यंत दररोज सायंकाळी वाहतुक कोंडी होते. आनंदनगर येथील रेल्वे पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा भार वाढल्याने ही वाहतुक कोंडी होते असे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु येथील ज्युपिटर रुग्णालयाजवळ बसविण्यात आलेले दुभाजक देखील कारण असल्याचे प्रवासी सांगतात.

भिवंडी – भिवंडी शहरातील खारेगाव टोलनाका ते दिवे अंजुर भागात दररोज होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण आहेत. येथील रस्त्याची चाळण झाली आहे. तर येथील काही ठराविक ठिकाणीच वाहतुक पोलीस पाहायला मिळतात. जुना आग्रा रोड मार्गावरील कशेळी-काल्हेर, दापोडे तसेच भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांवर प्रवास करणे कठीण झाले आहे. गोदामांमुळे अवजड वाहनांची वाहतुक या मार्गावरून सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडते. कोंडीमुळे येथील नागरिकांना, शाळकरी मुलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली होती.
कल्याण

  • शिवाजी चौकात एकाच वेळी वाहने आल्याने कोंडी होते. या कोंडीत शाळेच्या बसगाड्या, मालवाहू वाहने अडकून पडतात. यामध्ये शहरांतर्गत वाहतुकीतील वाहने अडकून पडतात. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतात. पण वाहनांची संख्या अधिक असल्याने कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते.
  • कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस स्मार्टसिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या भागातील रस्त्यांचे खोदकाम, काही ठिकाणी बांधकाम साहित्य पडले आहे. रिक्षांसाठी या भागात स्वतंत्र पुरेसे वाहनतळ नाही. त्यामुळे बहुतांशी रिक्षा रस्त्यावर उभ्या असतात.
  • डोंबिवलीत टंडन रस्त्यावर, दत्तनगर भागात मासळी बाजार भागात, क्रांतिनगर झोपडपट्टी रस्त्यावर दररोज वाहन कोंडी होते. अनेकदा या भागात वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे कोपर पूल कोंडीलावर कोंडी होते.

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर

बदलापूर उड्डाणपुल – शहरातील एकमेव उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसतो आहे. येथे दोन्ही बाजूंना वाहतूक पोलीस गर्दीच्या वेळी असतात. असे असतानाही वाहनांच्या रांगा एक एक किलोमीटरपर्यंत वाढलेल्या असतात.

बेलवली भुयारी मार्ग – अरूंद भुयारी मार्ग एकमेव उड्डाणपुलाला पर्याय आहे. मात्र येथून अनेकदा मोठी वाहने जात असताना इतर वाहनांना थांबावे लागते. तर या वाहनांच्या रांगा पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत रांगा लागतात. त्यामुळे बदलापूर अंबरनाथ मार्गावरील वाहनांना मोठा फटका बसतो.

बाजारपेठ – बदलापूर पश्चिमेतील बाजारपेठ सर्वाधिक कोंडीचा परिसर म्हणून ओळखला जातो. अरूंद रस्ता, त्यात शेजारी रेल्वे स्थानक, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा डझन रिक्षा थांबे, टॅक्सी थांबे, भाजी विक्रेते आणि बेकायदा वाहने उभी करणे अशा विविध कारणांमुळे येथे कोंडी होत असते. अनेकदा येथेही वाहतूक पोलीस नसतात.

हेही वाचा – Overhead Wire Break : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेचा खोळंबा

अंबरनाथ टी जंक्शन चौक – काटई बदलापूर मार्गावर अंबरनाथ शहराच्या वेशीवर आणि कल्याण बदलापूर राज्यमार्गाला जोडणाऱ्या टी जंक्शन चौकात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने येथे कोंडी होते आहे. अनेकदा सायंकाळनंतर येथे वाहतून पोलीस नसल्याने बेजबाबदारपणे वाहनचालक वाहने चालवून कोंडीत भर घालतात.
आनंदनगर एमआयडीसी चौक – काटई अंबरनाथ रस्त्यावरचा हा चौक खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत अडकतो आहे. अंबरनाथहून येणारी वाहतूक खड्ड्यांमुळे संथ होते. त्यात या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण अपूर्ण असल्याने कोंडी वाढते. वळण घेताना वाहनचालकांमध्ये खटके उडतात. येथेत रस्त्याच्या कडेला अतिक्रमणही वाढते आहे.

फॉलोवर लाईन चौक – उल्हासनगर पूर्वेतून येणारा रस्ता, कॅम्प तीन आणि दोनकडे जाणारा रस्ता आणि बाजारपेठेमुळे कल्याण बदलापूर रस्त्यावरचा हा चौक कायमच कोंडीत असतो. त्यातच येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे येथे अपघातही होतात. अनेकदा येथे वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे कोंडी वाढते.

Story img Loader