वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वसई-विरार शहरातील उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीसाठी असले तरी उड्डाणपुलांवर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. उलटय़ा दिशेने गाडी चालवणे, वळण यायच्या आधीच गाडी वळवणे, मध्येच दिशा बदलणे या सर्व प्रकारांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

नालासोपारा, वसई आणि विरार शहरांच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी उड्डाणपूल बनवण्यात आले आहे. नागरिकांची सोय व्हावी, वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी हे उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. मात्र वाहनचालकांच्या बेशिस्तपणा आणि नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवण्याच्या सवयीमुळे हे उड्डाणपूल वाहतूक कोंडीचे कारण बनत चालले आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंस वाहनचालकांकडून सतत नियमांचे उलंघन केले जात असल्यामुळे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होते. सकाळ व संध्याकाळच्या वेळेस सर्वात जास्त या उड्डाणपुलांचा वापर केला जातो. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई आहे, पण दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत चालली आहे.

दुचाकी चालक अचानक यू-टर्न येण्याआधीच वाहने वळवतात, तर कधी रिक्षाचालक रांगेतून बाहेर येऊन मध्येच रिक्षा चालवून गर्दी करतात. पोलिसांनी वाहतूक अडथळे लावलेले असतानाही दुचाकी चालक दिशा बदलतात. त्यामुळे मागून येणारी वाहने आणि समोरून येणारी वाहने दोघांची कोंडी होते. अचानक गाडय़ांनी दिशा बदलली तरीही कोंडी होते आणि मागची वाहने गोंधळून थांबतात. या रस्त्यावरून शाळेच्या बस, टँकर जात असल्यामुळे कोंडी झाल्यावर या वाहनांना जायला जागा मिळत नाही. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही जास्त प्रमाणत वाहतूक झाली तरी इथे वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडी लवकरच निस्तरता येत नाही, तर सामान्य नागरिकांना ही कोंडी हटवावी लागते. यामुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही तर अपघातांचीही शक्यता असते.

नालासोपाऱ्यातही सारखीच परिस्थिती असल्यामुळे तिथेही वाहतूक कोंडीची समस्या वाढत चाललेली आहे. नालासोपरा येथे पूर्वेला सिग्नल लावण्यात आले आहेत. तसाच उपक्रम विरार पूर्वेला झाला तर वाहतूक नियंत्रणात आणता येईल. ही वाहतूक कोंडी रोज होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी इथे हजर असणे गरजेचे आहे. पण इथे पोलिसांची उपस्थिती नसल्यामुळे यावर कोणतीही कारवाई होत नाही. वाहनचालकांकडून सतत नियमांचे उल्लंघन होत असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीची समस्या भीषण बनली आहे.

काही वळणांवर पोलीस उभे केलेले आहेत. सिग्नल बसवण्याची गरज नाही, ते आपोआप नियंत्रणात येतात. काही अवजड वाहनांमुळेही कोंडी होते. यावर आता लवकरच कारवाई करायला सुरू करू. या समस्येची संपूर्ण माहिती घेऊ  आणि उपाययोजना करू.    – संपत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग