ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी दोन टेम्पो बंद पडल्याने कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघे १५ मिनीटांचे अंतर पार करण्यास प्रवाशांना एक तास लागत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरून हजारो वाहने मुंबईच्या दिशेने वाहतूक करतात. सोमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर दोन टेम्पो बंद पडले. त्यामुळे या मार्गिकेवर कोपरी पूल ते माजीवडा नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. हे टेम्पो रस्त्यावरून बाजूला करण्यात आले आहेत. लवकरच वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader