ठाणे : घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी भागात मेट्रोची कामे आणि वाहतुकीचा भार यामुळे कापूरबावडी ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीमळे कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. उन्हाचे चटके आणि कोंडी अशा दुहेरी समस्येमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.

घोडबंदर भागातून हजारो वाहन चालक मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी कापूरबावडी मार्गे जातात. सध्या घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या निर्माण कामांमुळे मुख्य मार्गिका अरुंद झाली आहे. त्यातच या मार्गावर वाहनांचा भार मोठ्याप्रमाणात असतो. बुधवारी सकाळी या मार्गावर मेट्रोची कामांमुळे अरुंद झालेले रस्ते आणि वाहनांचा भार यामुळे कापूरबावडी ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली. जड वाहनांची वाहतुक देखील होऊ लागल्याने कोंडीत आणखी भर पडली.

गेल्याकाही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. दुचाकी स्वारांना आणि प्रवासी उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले आहेत. त्यातच कोंडी झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोंडी आणि उन्हाचे चटके अशा दुहेरी समस्येत वाहन चालक आहेत.

Story img Loader