लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा भागात मंगळवारी सकाळी चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावर उलटला. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले.
भिवंडी येथून एक ट्रक दादरच्या दिशेने वाहतूक करत होता. हा ट्रक सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास माजिवडा येथे आला असता चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक उलटून अपघात झाला. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा… डोंबिवलीत बिगारी कामगाराला खुर्चीला बांधून बेदम मारहाण
या घटनेची माहिती राबोडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक हायड्रा यंत्राच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यांनतर येथील वाहतूक सुरळीत झाली.