वसईतील नवघर ते घोडबंदर येथील गायमुख पर्यंत वाहनांच्या रांगा

ठाणे- घोडबंदर येथील गायमुख भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कंटेनर उलटल्याने घोडबंदर ते वसईतील नवघर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहे. १० मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागत आहे. सुमारे सात तास उलटूनही कंटेनर बाजूला करणे शक्य झाले नाही.

मुंबई अहमदबाद मार्गावरून ठाण्याच्या दिशेने एक कंटेनर येत होता. हा कंटेनर पहाटे ३ वाजता गायमुख घाटात आला असता तो उलटला. त्यामुळे वसई, बोरिवली येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मर्गिगेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी १० वाजेनंतरही येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती. या वाहतूक कोंडीत अनेक खासगी वाहने, बसगाड्या अडकून आहेत. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे.

Story img Loader