कल्याण- धुलीवंदनाचा आनंदोत्सव साजरा करत असताना, काही नागरिकांनी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात मद्यपान करुन वाहन चालविल्याने अशा मद्यपींवर कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक विभागाने कारवाई केली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.

धुलीवंदनाचा कार्यक्रम सर्वत्र शांतते पार पडावा म्हणून कल्याण, डोंबिवली वाहतूक विभागाने रस्तो रस्ती विशेष बंदोबस्त लावला होता. .या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. कोणतीही रस्ते दुर्घटना होणार नाही. आणि मद्यपान करुन कोणी वाहन चालवित असेल त्यांच्यावर कारवाईचे आदेश वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी वाहतूक विभागाला दिले होते.

how to clean tea strainer
काळी पडलेली चहाची गाळणी झटपट करा स्वच्छ; वाचा ‘या’ सोप्या टिप्स
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?
waste collection charges mumbai
मुंबई : कचऱ्यावर शुल्क आकारणीचा निर्णय अनिर्णित, महापालिका निवडणुकीमुळे कर आकारण्याची शक्यता कमी
Katraj Kondhwa road traffic jam, Katraj Kondhwa road,
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !
Sewage channel cover Pune, Pune roads,
झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !
easy hacks to clean dirty pillow in washing machine
कळकट, तेलकट, घाणेरडी उशी काही मिनिटांत होईल एकदम स्वच्छ; फक्त धुताना वॉशिंग मशीनमध्ये टाका ‘या’ ३ गोष्टी

हेही वाचा >>> कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची सात लाखाची ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक

या आदेशाप्रमाणे कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, डोंबिवली वाहतूक शाखेचे उमेश गित्ते यांनी आपल्या हद्दीत वाहतूक पोलीस, सेवक यांचा बंदोबस्त लावला होता. वाहतूक पोलिसांची गस्त चालू असताना कल्याणमध्ये मद्यपान करुन वाहन चालविताना २३ जण आढळून आले. डोंबिवलीत २१ जण आढळले. त्यांच्यावर महाराष्ट्र वाहतूक कायद्याचे कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. या सर्व मद्यपींवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना पुन्हा अशी कृती करणार नाही असे हमीपत्र आणि दंडात्मक कारवाई केली.

धुलीवंदन काळात मद्यपान करून वाहने चालवू नका, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader