ठाणे : नवी मुंबई येथील नेरूळ भागातील डाॅ. डि.वाय.पाटील क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कोल्ड प्ले कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामुंबईतील यंत्रणांनी सज्जतेची आखणी केली आहे. या कार्यक्रमासाठी नवी मुंबईत दहा हजाराहून अधिक वाहने येण्याचा अंदाज असून हि वाहने उभी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ परिसर, खारघर, तुलसी मैदान, भीमाशंकर सोसायटीजवळील सिडकोचे मैदान, पंचशील मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे, नवी मुंबई शहरात वाहतूक मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आलेले आहे. याशिवाय, या कार्यक्रमाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महत्वाचे काम असेल तर, या मार्गावरून प्रवास करा, असे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई येथील नेरूळ भागातील डाॅ. डि.वाय.पाटील क्रीडा प्रेक्षागृहात १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी कोल्ड प्ले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईत पहिल्यांदाच हा जागतिक कीर्तीचा ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, कार्यक्रमांसाठी अनेक नागरिकही येणार आहे. यामुळे कार्यक्रमाच्यानिमित्ताने नवी मुंबईत दहा हजाराहून अधिक वाहने येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या वाहनांमुळे महामुंबईत कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई आणि ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल लागू करत कार्यक्रमाच्या दिवशी अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी केली आहे. या पार्किंगस्थळावरून कार्यक्रमस्थळापर्यंत पोहचण्यासाठी बसगाड्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. पालघर पोलिसांकडूनही कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूकीला बंदी घालून ती वाहने दोन वाहनतळांवर उभी करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Intruder entered in Jeh bedroom Saif Ali Khan's staff narrates attack sequence
जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या घरात काय घडलं? करीना कपूर कुठे होती? मदतनीसने सगळंच सांगितलं
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Attack Suspect CCTV footage
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी कोण? CCTV फूटेज व्हायरल; ‘त्या’ व्हिडीओत पोलिसांना काय सापडलं?
District administration issues notice to organizers regarding children attending Coldplay concert navi Mumbai news
कोल्डप्ले संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर निर्बंध; जिल्हा प्रशासनाकडून आयोजकांना सूचना
indigo Flight
IndiGo Passengers : पुणे विमानतळावर इंडिगोच्या प्रवाशांना मनस्ताप! विमान वेळेआधी पोहोचूनही सामानासाठी २ तासांचा उशीर
8th Pay Commission for Central government employees approved
आठव्या वेतन आयोगाची मुहूर्तमेढ; लाखो कर्मचारीसेवानिवृत्तांसाठी आनंदवार्ता
goa tourism foreign tourist indian tourist
गोवा खरंच ओस पडू लागलं आहे का? एका एक्स पोस्टवरून सरकार का बिथरलंय?
bengaluru techie suicide
खासगी फोटोवरुन काका करायचा छळ; २४ वर्षीय तरुणीनं स्वतःला पेटवून घेतलं

हेही वाचा >>>उल्हासनगरच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे

नवीमुंबईतील वाहतुक बदल

कोल्डप्ले कार्यक्रमाच्या दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत, महत्वाच्या व्यक्ती तसेच प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी १८, १९ आणि २१ जानेवारी रोजी दुपारी २ ते रात्री १२ यावेळेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास तसेच पार्किंग करण्यास मनाई असेल. तसेच जड अवजड वाहनांना कोणत्याही ठिकाणी पार्किंग करता येणार नाही. १८, १९ आणि २१ जानेवारीला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील. डॉ डी. वाय. पाटील स्टेडियमजवळील भिमाशंकर सोसायटी ते एल पी रिक्षा थांबा या दरम्यानचा सेवा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी तसेच वाहने पार्किंग कल्यास मनाई असणार आहे. या मार्गावरील वाहने सायन पनवेल महामार्गावरील उरण फाटा ते एल पी पुल या पर्यायी मार्गे जातील. तुर्भे एमआयडीसीतील इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन टर्मिनल सेवा रस्ता वाहनांना ये-जा करण्यास तसेच वाहने पार्किंग करण्यास मनाई असणार आहे. इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनची वाहने वगळून हे बदल असणार आहेत. या मार्गावरील वाहने तुर्भे एमआयडीसीकडून येणारी वाहने पुण्यनगरीकडून उरणफाटामार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच हायड्रीलिया कंपनीकडून येणारी वाहने ए ल पी पुल सेवारस्ता या ठिकाणहून इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>>कुमार आयलानी यांना पुत्रशोक; धीरज आयलानी यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

असे आहेत ठाण्यात वाहतूक बदल

मुंबई, वसई, विरार कडून घोडबंदरच्या दिशेने ठाणेकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. भिवंडी शहरातून जेएनपीटी तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे भिवंडी कल्याण रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण सोनाळे गाव नाशिक मार्ग जेएनपीटी नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना बासुरी हॉटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. गुजरातकडून घोडबंदरच्या दिशेने ठाणेकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाळकुम, साकेत, नवीन कळवा पुल येथून विटावा मार्गे नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. खारीगाव टोलनाका, गॅमन जंक्शन, पारसिक कार्यालय सर्कल, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना पारसिक सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

अशी आहे वाहनतळाची व्यवस्था

नवी मुंबईत होणाऱ्या ‘कोल्डप्ले’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहा हजारहून अधिक वाहने शहरात येणार आहेत. यामुळे नवी मुंबई पालिका आणि पोलिसांनी अनेक उपयायोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोंडी टाळण्यासाठी तुलसी मैदान येथे १०० वाहने उभी करण्याची व्यवस्था असणार आहे. भीमाशंकर सोसायटी येथील सिडको पार्किंग पाँईंटजवळ ७०० वाहने, सेकटर १५ सीबीडी येथे ५०० वाहने अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर नेरूळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकातून नवी मुंबई परिवहन सेवेच्या दहा गाड्या प्रवाशांसाठी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता शिरीष आधारवड यांनी दिला आहे. कार्यक्रम आयोजकांच्या वतीने पंचशील मैदानात दोन हजार वाहने उभी करण्याची व्यवस्था असणार आहे. तर खारघर आणि नवी मुंबई विमानतळाजवळ देखील वाहनतळाची व्यवस्था असणार आहे. वाहनतळ येथून कार्यक्रमाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी खासगी बसची व्यवस्था आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader