ठाणे : मोहरम निमित्ताने शनिवारी मुंब्रा आणि भिवंडी शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. मुंब्रा शहरातील वाहतूक मुंब्रा बाह्यळण मार्गे सोडली जाणार आहे. त्यामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांचा भार वाढण्याची शक्यता आहे. तर भिवंडीतील वाहतूक बदलामुळे मुंबई नाशिक महामार्ग, वाडा भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोहरम निमित्ताने मुंब्रा आणि भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांकडून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या वेळी हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. मुंब्रा येथील मिरवणूक शिमला पार्क येथून रेतीबंदर पर्यंत काढली जाते. मिरवणुकीच्या वेळी तसेच मिरवणुकीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मुंब्रा येथे शनिवारी दुपारी एक ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भिवंडी येथेही अनेक ठिकाणी मिरवणूका काढल्या जाणार आहेत. त्यामुळे येथेही दुपारी दोन ते रात्री ९ पर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात येणार आहे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
The murder of a minor girl will be tried in a fast track court thane news
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण जलदगती न्यायालयात चालणार
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

हेही वाचा >>> उल्हासनगर महापालिकेची सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून अडीच हजार बीजगोळे तयार

वाहतूक बदल पुढील प्रमाणे

-कल्याण फाटा, शिळफाटा येथून मुंब्रा शहरात वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

– कळवा, खारेगाव येथून मुंब्रा शहरात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रेतीबंदर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

– ही वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून इच्छित स्थळी जातील.

मुंबई, ठाणे, मानकोली येथून जुना ठाणे आग्रा मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना अंजूरफाटा येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने वसई, कारिवली जकात नाका व वीट भट्टी मार्गे इच्छित स्थळी जातील.

– मुंबई, ठाणे येथून जुना ठाणे-आग्रा रोडने अंजूरफाटा येथून भिवंडी शहरात येणाऱ्या टीएमटी, एसटी बसगाड्या आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाणे येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. टीएमटी, एसटी, बसगाड्यातील प्रवासी नारपोली पोलीस ठाणे येथे प्रवासी उतरतील. हलकी वाहने देवजीनगर किंवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील

– रांजनोली नाका येथून भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने रांजनोली नाका येथून वळसा घेवून मुंबई-नाशिक बाह्यवळण येथून वरून माणकोली नाका, अंजूरफाटा, वसई रोड, ओवळी खिंड, ओवळी गाव, ताडाळी जकात नाका, जलवाहिनी मार्गे इच्छित स्थळी जातील.

– एसटी, केडीएमटी बसगाड्यांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने रांजनोली नाका येथे प्रवाशी उतरवतील व तेथूनच प्रवासी भरून इच्छित स्थळी जातील व इतर वाहने रांजनोली नाका येथूनच वळसा घेवून परत जातील.

– वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गे जातील.

– वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना मेट्रो हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहने मेट्रो हॉटेल येथे उजवे वळण घेवून संगमपाडा रोड-अजयनगर पर्यंत येऊन पुढे जातील.

– वडपा जकातनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धामणगाव जांबोळी जलवाहिनी नाका व चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने धामणगाव जलवाहिनी येथे उजवे वळण घेवून वाड्याकडे पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच बसगाड्या चाविंद्रा जकात नाका येथे प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बाजारपाटी नाका मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने अजयनगर-संगमपाडा-मेट्रो हॉटेल डावीकडे वळून वंजारपाटी पूलावरुन इच्छित स्थळी जातील.

Story img Loader