मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर मध्यरात्री उलटला. टॅंकरमधील तेल रस्त्यावर सांडल्याने सोमवारी सकाळपासून ठाणे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. घोडबंदर मार्गावर कापूरबावडी ते मानपाडा, मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते माजीवडा आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर माजीवडा ते कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, शाळेच्या बसगाड्या वाहतूक अडकून होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ठाणे: फार तर २८ दिवस जेलमध्ये रहावे लागेल; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा व्यक्त केली अटकेची भीती

गुजरातहून अंबरनाथच्या दिशेने एक खाद्य तेल वाहून नेणारा टॅंकर निघाला होता. या टॅंकरमध्ये ३३ टन तेल होते. टॅंकर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आला असता, वाहन चालकाचा ताबा सुटला आणि टॅंकर रस्त्यावर उलटला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक थांबविण्यात आली होती. सकाळी ६ वाजताच्या सुमारास यंत्राच्या मदतीने अग्निशमन दलाने रस्त्यावर सांडलेले खाद्यतेल काढले. परंतु या अपघाताचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला. घोडबंदर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाच मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता. शाळेच्या बसगाड्याही वाहतूक कोंडीत अडकून बसल्याने विद्यार्थी वेळेत शाळेमध्ये पोहचले नाहीत.