ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे डम्परचे चाक पंक्चर झाल्याने मागून आलेल्या एका ट्रकची या डम्परला धडक बसली. त्यानंतर या ट्रकला एका दुचाकीस्वाराची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार वैभव डावखर (२७) याचा मृत्यू झाला. तर ट्रकमधील दोघे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरुन पहाटे ३ वाजताच्या सुमारास भिवंडीच्या दिशेने डम्परची वाहतुक सुरू होती. डम्पर गोल्डन डाइज येथील उड्डाणपूलाजवळ आला असता, डम्परचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे डम्पर चालकाने भर रस्त्यात डम्पर उभा केला होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकची या डम्परला धडक बसली. या ट्रक मागून दुचाकी चालक वैभव डावखर हा बाळकुम येथील त्याच्या घरी जात होता.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Biker dies after being hit by PMP bus on nagar road
पुणे : नगर रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

हेही वाचा…ठाणे शहरातील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा, दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी

या अपघातग्रस्त ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली. अपघातात वैभव डावखर गंभीर जखमी झाला. तसेच डम्परला धडक बसल्याने ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. या ट्रकमधील चालक धर्मेंद्र यादव आणि त्याचे सहकारी सुनील बाकरे हे देखील जखमी झाले. वैभव याला येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तर, धर्मेंद्र आणि सुनील यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader