मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी ७.५० तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कल्याणहून मुंबई, ठाण्याच्या दिशेने होणारी धिम्या मार्गिकेची वाहतूक ठप्प झाली होती. ऐन सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कळवा भागातील नागरिक चालत ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत पोहचले होते. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा भार वाढला होता.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवर पंखे नसल्याने प्रवासी घामाघूम
सुमारे २० ते २५ मिनीटांनी येथील वाहतूक सुरळीत झाली. दिवा रेल्वे स्थानकाजवळील धिम्या मार्गिकेवर ७.५० मिनीटांनी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे एेन सकाळी ठाण्याच्या दिशेने होणारी धिम्या मार्गिकेची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातून हजारो नोकरदार मुंबईत कामानिमित्त जात असतात. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यानंतर रेल्वे सेवा ठप्प झाल्याची माहिती प्रवाशांना मिळाल्यानंतर कळवा रेल्वे स्थानकातील अनेक प्रवाशांनी चालतच ठाणे रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे प्रवाशांचा भार ठाणे रेल्वे स्थानकात आला होता. सकाळी ८.१० वाजता येथील वाहतूक पूर्ववत झाली.