कल्याण मधील वाडेकर भागात गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीयांच्या एका टोळीने घरातील दोन लाख 40 हजाराचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. घरातून बाहेर पडताना या टोळीने घरमालकांकडून भिक्षा म्हणून दोनशे रुपये मागून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृतीयपंथीयांच्या वेशात असलेले हे पाच जण गणपती दर्शनाच्या निमित्ताने घरात घुसून चोऱ्या करत असल्याने कल्याण डोंबिवलीतील गणेश भक्तांमध्ये अस्वस्थता आहे. वाडेघर भागातील सुरेश पाटील यांच्या घरात या टोळीने १५ तोळ्याची सोन्याची गंठण चोरून नेली आहे. सुरेश पाटील यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे स्थानकात अपघातप्रवण फलाटाचा प्रवाशांना धसका

सुरेश पाटील यांनी घरातील गणपती जवळ आई आणि पत्नीची सोन्याच्या १५ तोळ्याच्या गंठनी धन म्हणून मखरातील गणपती मूर्तीच्या पाटा जवळ ठेवल्या होत्या.

रविवारी त्यांच्या घरात पाच तृतीयपंथीय गणपती दर्शनाचे निमित्त करून आले. सकाळच्या वेळेत त्यांनी घरात प्रवेश केला होता. पाटील यांच्या घरात झाडलोट सुरू होती. तृतीयपंथीय दर्शन घेऊन प्रसाद घेऊन निघून जातील असे पाटील कुटुंबियांना वाटले.

दरम्यान तृतीयपंथीय गणपतीचे दर्शन घेत असताना पाटील यांची आई घरातील कचरा टाकण्यासाठी बाहेर गेल्या. यादरम्यान  एका तृतीयपंथीयाने गणपतीच्या पाटा जवळ ठेवलेली सोन्याची पुंजी गुपचूप उचलून स्वतःजवळ लपवून ठेवली.

हेही वाचा >>> ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या

त्यानंतर तृतीयपंथीयांनी पाटील कुटुंबीयांकडे भिक्षा म्हणून दोन हजार रुपयांची मागणी केली. पाटील यांच्या आईने दोनशे रुपये दिले. प्रसाद घेऊन तृतीयपंथीय घरातून निघून गेले. तोपर्यंत पाटील कुटुंबीयांना गणपती जवळील सोन्याचा ऐवत चोरीला गेला आहे हे लक्षात आले नाही. सुरेश पाटील गणपतीची पूजा करत असताना त्यांना गणपती जवळील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे दिसले. त्यांनी या संदर्भात पत्नी आणि आईकडे विचारणा केली. त्यांनी सोन्याच्या ऐवजाला हात लावला नसल्याचे सांगितले. तृतीयपंथीयांच्या व्यतिरिक्त घरात कोणी दर्शनासाठी आले नाही. त्यामुळे घरात दर्शनासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनीच ऐवत चोरला असल्याचा संशय व्यक्त करून सुरेश पाटील यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली आहे. खडकपाडा पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender gang stealing gold worth rs 2 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan zws