ठाणे : जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कोणाला पालकमंत्री पद मिळेल यावरून चर्चा सुरू आहे. रविवारी खोपट आगाराच्या पाहाणी वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पद स्विकारावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
u
जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारावे आणि ठाणे जिल्ह्याचा विकास करावा असे सरनाईक म्हणाले.