ठाणे : जमीनीवरील वाहतुक हवेतून झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पाॅड टॅक्सीसाठी देण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यासाठी महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मिरा भाईंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जेपीई हा ६० मीटर रस्ता येथेही पाॅड टॅक्सी सुरू करण्याचे निश्चित केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरात वाहतुक कोडींची समस्या मोठ्याप्रमाणात आहे. घोडबंदर भागातील नागरिकांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. या भागात नागरिककरण वाढले असताना रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा भार आलेला आहे. तसेच भिवंडी आणि उरण जेएनपीटीतून सुटणाऱ्या अवजड वाहनांचा भार देखील घोडबंदर मार्गावर अधिक आहे. मागील काही वर्षांपासून ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहे. वडाळा-घाटकोपर- कासारवडली या मार्गिकेच्या निर्माणाचे कामे अद्यापही पूर्ण झाले नसल्याने मेट्रो प्रकल्पाच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. त्यातच आता ठाणे आणि मिरा भाईंदर भागात पाॅड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला सरनाईक म्हणाले की, पाॅड टॅक्सी संकल्पनेला मागील वर्षी ‘बीकेसी’मध्ये परवानगी देण्यात आली होती.

मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोला समांतर वाहतुक व्हावी यासाठी घोडबंदर भागातील भाईंंदरपाडा ते विहंग हिल्स चौका पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महापालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर पाॅड टॅक्सीची निर्मिती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पाॅड टॅक्सीसाठी जागा सूचविली होती. हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बीकेसीमध्ये पाॅड टॅक्सीसाठी परवानगी दिली होती. तशाच प्रकारची परवानगी ठाणे महापालिका आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही धोरण निश्चित केले आहे असे सरनाईक म्हणाले. जमीनीवरील वाहतुक ही हवेतून नेल्यास घोडबंदर आसपासच्या भागातील वाहतुक कोंडीवर तोडगा निघू शकेल असेही ते म्हणाले. माझ्या मतदरासंघातील ठाणे महापालिका हद्दीतील भाईंदपाडा ते विहंग हिल्स हा ४० मीटरचा रस्ता आणि मिरा भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जेपीई हा ६० मीटर रस्ता येथे पाॅड टॅक्सी सुरू करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/LoksattaLive/status/1895432393890423136

काय आहे पाॅड टॅक्सी

पाॅड टॅक्सी उन्नत मार्गाने वाहतुक करणार आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.