ठाणे : खोपट भागातील रमाबाई आंबेडकर नगर या परिसरात असलेल्या एका उद्यानामधील झाड जवळील दोन घरावर पडले. या घटनेत दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. खोपट भागात रमाबाई आंबेडकर उद्यान आहे. या उद्यानाजवळच काही घरे आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या उद्यानातील एक मोठे झाड रविवारी उद्यानाजवळ असलेल्या दोन घरावर पडले. या घटनेत प्रीतम बाचुटे (२२) यांच्या डोक्याला आणि प्रीती बाचुटे(२५) यांच्या मानेला दुखापत झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात या दोघांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
First published on: 04-09-2022 at 11:17 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree collaspe in hous at khopat in thane tmb 01