ठाणे : महापालिका क्षेत्रातील आदिवासी भूमिपूत्रांच्या गाव, पाडे आणि वाड्यांना समूह पूनर्विकास योजनेतून (क्लस्टर) वगळण्यात यावे, आदिवासी वनजमीन मागणीचे प्रलंबित दावे त्वरीत निकाली काढावे, आदिवासींची खोटी प्रमाणपत्र दाखल करून शासकीय नोकऱ्या बळकावणाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासींनी आंदोलन केले. यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

शासकीय कामात आदिवासींना येणाऱ्या अडचणी, शासकीय प्रकल्प आदिवासी जमिनींवर येऊ लागल्याने या मुद्द्यावर शुक्रवारी आदिवासी एकदा परिषद आणि आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी सुमारे ७० ते ८० आदिवासी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील आदिवासी भूमिपूत्रांच्या गाव, पाडे आणि वाड्यांना समूह पूनर्विकास योजनेतून (क्लस्टर) वगळण्यात यावे, आदिवासी वनजमीन मागणीचे प्रलंबित दावे त्वरीत निकाली काढावे, आदिवासींची खोटी प्रमाणपत्र दाखल करून शासकीय नोकऱ्या बळकावणाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे, गायरान जमिनीवरील सावकारांचे रिसाॅर्ट, कोळंबी प्रकल्प, इतर उद्योगांचे प्रकल्प कायमस्वरूपी हटवावी, अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे अशा विविध मागण्यांसाठी हा निर्दशन मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही दिले.

second title fight of Maharashtra Kesari will also be held in Ahilyanagar
‘महाराष्ट्र केसरी’ची दुसरी किताबी लढतही अहिल्यानगरमध्येच रंगणार!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
malang gad festival
मलंग गडाच्या उत्सवासाठी दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी; दोन्ही गटांकडून भाविकांना आवाहन, दोघांकडून तयारी
Pune Municipal Corporation starts implementation of Swanidhi se Samruddhi scheme Pune print news
पीएम स्वनिधीसाठी होणार सर्वेक्षण !
mahayuti ncp bjp contest pimpri chinchwad municipal elections
पिंपरी-चिंचवडसाठी महायुतीत चुरस
pimpri chinchwad municipal corporation news
पिंपरी : शहराची लोकसंख्या ३० लाख आणि पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Story img Loader