ठाणे पोलिसांनी ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात एका चोराला अटक केली आहे. पण त्याचा तपास केल्यानंतर हा एखादा साधा चोर नसून हाय प्रोफाईल चोर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. कारण मुंबई, ठाण्यात चोरी करण्यासाठी हे चोर महाशय चक्क विमानानं मुंबईत दाखल व्हायचे, एका ड्रेनेजच्या पाईपात राहायचे आणि पुन्हा विमानानेच आपल्या घरी परतायचे! ही बाब उघड झाली तेव्हा पोलीसही काही काळ चक्रावले. सध्या या चोराची कसून चौकशी केली जात असून त्याच्या इतर गुन्ह्यांचाही तपास पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं घडलं काय?

ठाणे पोलिसांनी वागळे इस्टेट भागात गेल्या आठवड्यात अर्थात २५ जुलै रोजी एका चोराला अटक केली. राजू मोहम्मद जेनाल शेख उर्फ बंगाली असं या चोराचं नाव होतं. हा चोर या भागातल्या एका ज्वेलरकडे चोरलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी आला होता. पोलिसांना याची खबर आधीच लागली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या चोराला अटक केली. पण त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांना या चोर महाशयांच्या पार्श्वभूमीचा थांगपत्ता लागला!

सायबर हल्ल्यामागे चीनचाच हात! जर्मनीचा दावा; परराष्ट्रमंत्रालयाची राजदूतांना समज

राजू मोहम्मद जेनाल शेख उर्फ बंगाली हा मूळचा त्रिपुराचा रहिवासी आहे. बंगाली फक्त चोरी करण्यासाठी त्रिपुराहून थेट मुंबईपर्यंत चक्क विमानानं यायचा. ठाण्याच्या आसपासच्या भागात एका ड्रेनेजच्या पाईपमध्ये बंगाली वास्तव्य करायचा. यानंतर आसपासच्या भागात जिथे चोरी करायची आहे, त्या घरांची रेकी करायचा. योग्य वेळ साधून बंगाली तिथे हात साफ करायचा. चोरी केलेला माल स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांना विकून पुन्हा ऐटीत विमानानंच बंगाली त्रिपुराला परत जायचा!

आत्तापर्यंत बंगालीनं सात वेळा केल्या चोऱ्या!

बंगालीनं आत्तापर्यंत किमान सात वेळा अशाच प्रकारे त्रिपुरा ते त्रिपुरा व्हाया मुंबई प्रवास करून चोऱ्या केल्या आहेत. बंगाली पकडला गेला तेव्हा त्याच्याकडे सोन्याचे दागिने आणि १.१३ लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. बंगालीविरुद्ध महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातच्याही काही भागात चोऱ्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत.