ट्रोगन हिल सोसायटी, पाटील नगर, बदलापूर (पश्चिम)

Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Reserved roads in MHADA colonies belong to the municipal corporation Mumbai news
म्हाडा वसाहतींतील आरक्षित रस्ते पालिकेकडे; ‘जैसे थे’ स्थितीत हस्तांतरण
mumbai municipalitys bridge connecting Marve and Manori beaches has received approval
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
Mumbai, MHADA , houses MHADA ,
मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
average air quality index in uran has remained at the level of 150 to 200
उरणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर्षभर १५० पार

निसर्गरम्य वातावरण, पहाटे आणि सायंकाळी चिमण्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा वावर. आता इतरत्र दुर्मीळ झालेला छान गार वारा. त्यात सर्वात उंच ठिकाणी असल्याने इथून चारही बाजूचे बदलापूर शहर दिसते. शहराच्या पश्चिमेकडच्या पाटीलनगरमधील ट्रोगन हिल हे गृहसंकुल या वैशिष्टय़ांमुळे आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले आहे..

नागरिकीकरणाच्या रेटय़ात आणि गर्दीत प्रत्येक जण एकांताच्या शोधात असतो. त्यासाठी उंचच्या उंच इमारतींमध्ये घरे घेत असतो. वर्दळीपासून आपले घर दूर असावे असे बहुतेकांना वाटत असते. अशाच मागणीतून पुढे हिल संस्कृती उदयास आली. मुंबईपासून ते थेट कल्याणपर्यंत विविध नावांचे हिल आणि त्यावर वसलेली गृहसंकुले आपल्याला पाहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार बदलापुरातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहायला मिळतो. बदलापूर स्थानकापासून पश्चिमेकडे अवघ्या काही अंतरावर एका छोटय़ाशा डोंगरावर ट्रोगन हिल नावाची सोसायटी आहे. एका बाजूला मोहनानंद नगर, मागे मांजर्लीचा भाग तर दुसऱ्या बाजूला पोखरकरनगर आणि तिसऱ्या बाजूला गणेश चौक अशा सर्वाच्या मधोमध असलेल्या पाटीलनगरच्या डोंगरावर सर्वात उंच ठिकाणी ट्रोगन हिल सोसायटी आहे. या सोसायटीच्या तळमजल्यावरूनच संपूर्ण बदलापूर शहराचे दर्शन आपल्याला घडते. टेरेसवरून तर अंबरनाथ शहराचा काही भाग, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे उल्हास नदी, ताऊलीचा डोंगर असा नजारा दिसतो. त्यामुळे निसर्गसंपन्न बदलापूरची झलक या सोसायटीवरून पाहायला मिळते. त्यामुळे दिवसभराच्या थकव्यातून एक समाधानकारक दिलासा येथे राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाला मिळतो. ट्रोगन हिल सोसायटी २०१३ मध्ये बांधून पूर्ण झाली. एकूण ४३ सदनिका असलेल्या या सोसायटीत बहुतेक महाराष्ट्रीय कुटुंबे राहतात.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव</p>

सोसायटीत पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला जातो. पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची विधिवत पूजा करून उत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जात असला तरी यातही आपला वेगळा ठसा ट्रोगन हिल सोसायटीने उमटवला आहे. संपूर्ण सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सवासह सात गणेशमूर्तींची स्थापना होते. विशेष बाब म्हणजे सातही गणेशमूर्ती शाडूच्या असतात. त्यांची उंचीही जवळपास सारखीच असते. एकाच ठिकाणी या मूर्ती खरेदी केल्या जातात. गणेशोत्सवानंतर विसर्जनासाठी सोसायटीच्या आवारातच विसर्जन कुंडाची व्यवस्था केली जाते. त्यातच सर्व मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सोसायटीच्या या उपक्रमाचे शहरातही कौतुक केले जाते. गणेशोत्सवासोबतच नवरात्रोत्सव, मकरसंक्रांत, होळी असे सणही मोठय़ा उत्साहाने साजरा केले जातात. त्यामुळे सोसायटीत एकोपा कायम राहण्यास मदत होत असते, असे सोसायटीचे अध्यक्ष गोविंद कुंभार सांगतात. उत्सवांसह सोसायटीत गांधीजयंती, नववर्ष या दिवशी श्रमदान करत सोसायटीत स्वच्छता अभियान राबवले जाते. सोसायटीत जवळपास सर्वच उत्सवांत स्नेहभोजन आयोजित केले जाते. अशा कार्यक्रमांसाठी सोसायटीने बचतीतून पैसा उभा करून अनेक साहित्य खरेदी केले आहे. त्यामुळे सोसायटीचा कार्यक्रमांवरील खर्च कमी होतो.

कचरा व्यवस्थापनासाठी निसर्गदूत

स्थानिक नगरसेवक श्रीधर पाटील यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या निसर्गदूत अभियानाची खरी सुरुवात पाटील नगरच्या याच ट्रोगन हिल सोसायटीतून झाली होती. सोसायटीतील सर्वच सदनिकाधारकांनी घरातील ओला कचरा, उरलेल्या भाज्या घराबाहेर न टाकता ते कचरा निर्मूलन करणाऱ्या टोपलीत टाकून त्यातून खतनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे सहसा घरातील ओला कचरा बाहेर जात नाही. त्यात प्लास्टिकचा वापर कमी झाल्याने लवकरच सोसायटी प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्वास सोसायटीचे सदस्य सुहास सावंत व्यक्त करतात. सोसायटीच्या आवारात काही झाडेही लावण्यात आली आहेत. मात्र डोंगरावरील खडकावर इमारत उभी असल्याने येथे मोठय़ा झाडांचे रोपण शक्य नाही. सर्वात उंच ठिकाणी असल्याने येथे दिवसभर खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश असतो. अतिशय आल्हाददायक वातावरणामुळे शरीरस्वास्थ्यही बिघडत नाही, असे खजिनदार किरण गोसावी सांगतात.

पाण्याबाबत शिस्त

सोसायटीचे स्थान उंचावर असले तरी पाटीलनगर भागातील इमारतींना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या वेळा निश्चित असल्याने इथेही मुबलक पाणी मिळते. त्यात सोसायटीच्या पाण्याच्या टाक्यांमधून दररोज फक्त २० मिनिटेच पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना पाण्याबाबतची शिस्त लागली आहे.

ट्रोगन म्हणजे काय?

सोसायटीच्या नावावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. ट्रोगन हे एका पक्ष्याचे नाव आहे. अमेरिका आणि आफ्रिकेत तसेच उष्ण कटिबंधीय वातावरणात हा पक्षी आढळतो. प्रवासी पक्षी नसल्याने झाडांना सुतार पक्ष्यासारखे छिद्र पाडून हा पक्षी निवास करत असतो. त्यावरूनच या सोसायटीचे नाव ठेवण्यात आले आहे.

Story img Loader