ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पुन्हा एक ट्रक बंद पडला. त्यामुळे नितीन कंपनी ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या ट्रकला बाजूला करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – डोंबिवलीत रविवारी पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे ‘बुक स्ट्रीट’; एक लाख पुस्तकांची रस्त्यावर मांडणी

नितीन कंपनी येथे शुक्रवारी सकाळी एक ट्रक बंद पडला होता. त्यामुळे नितीन कंपनी ते ऐरोली टोलनाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे नाशिक, ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्यांचे हाल झाले होते. या घटनेस १२ तासही उलटले नसताना पुन्हा नितीन कंपनी भागात मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारा एक ट्रक बंद पडला. त्यामुळे नितीन कंपनी ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा परिणाम घोडबंदर तसेच अंतर्गत मार्गावरही जाणवला. वाहतूक कोंडी त्यात उन्हाचा तडाखा यामुळे नागरिकांचे हाल झाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck stalled again in thane causing traffic jam ssb