मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बारा कर्मचाऱ्यांना स्थानिक दुकानदारांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे .बस उभी करण्यावरून निर्माण झालेल्या भागातून ही घटना घडली
हेही वाचा- डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात चोऱ्या करणारा डहाणुचा चोरास अटक
मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरुन पालिकेच्या बस सुटत असतात. शनिवारी दुपारी एका बस चालकाचा स्थानिक दुकानदाराची वाद झाला. यावेळी ‘टॉप टेन’ नावाच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी बस चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिवहन विभागाचे इतर कर्मचारी मदतीला आले. मात्र इतर दुकानदारांचा जमाव जमला आणि २० ते २५ जणांनी या १२ कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. नया नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नया नगर पोलिसांनी दिली.