कल्याण– कल्याण येथील पश्चिमेतील शिवाजी चौकातील एक अतिधोकादायक इमारत तोडण्याचे काम गुरुवारी सकाळी १० ते शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत केले जाणार आहे. सर्वाधिक वाहन वर्दळीचा हा भाग आहे. या रस्त्याकडून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक दोन दिवस अन्य मार्गावरुन वळविण्यात आली आहे. शिवाजी चौकात भगवानदास मेन्शनही ४० वर्षापूर्वीची तीन माळ्याची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीचा पुनर्विकास प्रस्तावित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही इमारत कल्याण डोंबिवली पालिकेकडून जमीनदोस्त करण्याचे काम केले जाणार आहे. वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल करण्यास सशर्त परवानगी दिल्याने पालिकेने हे तोडकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला. या तोडकामामुळे शिवाजी चौकातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना या प्रवेश बंदीतून सूट आहे.

वाहतुकीत बदल

कल्याण शहराच्या विविध भागातून शिवाजी चौक मार्गे पुष्पराज हाॅटेल मार्गे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक शिवाजी चौक येथे बंद केली जाणार आहे. ही वाहने गुरुदेव हाॅटेल, कल्याण रेल्वे स्थानक ते दीपक हाॅटेलकडून पुष्पराज हाॅटेलमार्गे किंवा मुरबाड रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two days of traffic changes at shivaji chowk in kalyan ysh
Show comments