ठाणे : ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. प्रतिक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रतिक आणि राजेश हे दोघेही सोमवारी रात्री १:३० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून ठाण्याच्या दिशेने येत होते. त्यांची दुचाकी मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर आली असता चालकाचे  दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपूलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे प्रतिक आणि राजेश हे दोघेही उड्डाणपूलावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.