ठाणे : शिळफाटा येथे समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचविण्यासाठी गेलेल्या ट्रक चालकाचा ट्रक शेतात उलटून ट्रकमधील दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. दिनेश गोंड आणि चिंतामण खुताडे यांचा अपघातात मृत्यू झाला असून शरद वाघ हे या अपघातात जखमी झाले आहेत. वाघ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर या घटनेची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा-  डोंबिवलीत धावत्या मोटीराला आग

दिनेश गोंड, चिंतामण खुताडे, शरद वाघ यांच्यासह पाच ते सहाजण एका वीट भट्टीवर काम करतात. रविवारी सायंकाळी हे सर्वजण एका ट्रकमध्ये वीटा घेऊन तळोजा येथे निघाले होते. ट्रकच्या मागील बाजूस असलेल्या वीटांवर दिनेश, चिंतामण, शरद यांच्यासह आणखी दोन मजूर बसले होते. ट्रक शिळफाटा येथील वाकळण गाव येथे आला असता, समोरून एक व्यक्ती भरधाव दुचाकी घेऊन ट्रकच्या दिशेने येत होता. त्यामुळे ट्रक चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्यासाठी ट्रक डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक चालकाचा ताबा सुटला.

हेही वाचा- पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चोरट्याचे बेशुध्दीचे ढोंग ; कल्याणमधील रहेजा संकुलातील प्रकार

त्याचवेळी वीटांवर बसलेल्या इतर मजूरांनी ट्रक बाहेर उडी घेतली. परंतु दिनेश, चिंतामण आणि शरद यांना बाहेर उडी मारता आली नाही. ट्रक शेतात जाऊन उलटला असता या घटनेत दिनेश आणि चिंतामण यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर शरद यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in truck accident while trying to save two wheeler driver thane news dpj