कल्याण- येथील मोहने भागातील मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या नॅशनल रेयाॅन कंपनीच्या (एनआरसी) आवारात एका कंत्राटदाराचे वीज तंत्रज्ञ कंपनी आवारातील वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी रोहित्राजवळ आगीचा भडका उडून मोठा स्फोट झाला. या स्फोटात तेथे काम करणारे दोन्ही वीज तंत्रज्ञ गंभीररित्या भाजले आहेत. त्यांना कंपनीच्या याच भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार सुकलाल चौधरी यांच्या तक्रारीवरुन एनआरसी कंपनीत काम करणारे ठेकेदार प्रताप अधिकराव सुर्वे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वर अहमद (३८), गोरख धोंडीराम जाधव (६५) अशी गंभीर जखमी वीज तंत्रज्ञांची नावे आहेत.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Rent free office space in Mhada Bhawan to developer in vangani
वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

हेही वाचा >>>प्रसिध्द लेखक आनंद नीलकांतन यांना धमकी आणि खंडणीची मागणी

पोलिसांनी सांगितले, बंद असलेल्या एनआरसी कंपनीच्या आवारातील विद्युतीकरणाचे काम करण्यासाठी ठेकेदार प्रताप सुर्वे यांनी आपल्या सेवेतील दोन वीज तंत्रज्ञ अहमद, गोरख यांना सोमवारी सकाळी सात वाजता बोलविले होते. ते रोहित्राजवळ दुरुस्ती करत असताना अचानक त्यामधून ज्वाला बाहेर येऊन मोठा स्फोट रोहित्राजवळ झाला. घटनास्थळी काम करत असलेले अहमद, गोरख यामध्ये गंभीररित्या भाजले. या कामगारांना कामाच्या ठिकाणी काम करताना सुरक्षिततेची आवश्यक साधने न दिल्याने हे दोन्ही कामगार गंभीर जखमी झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेकेदारावर ठेवला आहे.महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एन. आठवले या प्रकरणाचा तपास करत आहेत.