ठाणे: भिवंडी येथील मिल्लत नगर भागात बांधकामासाठी वापरण्यात येणारे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणीची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मित्तलनगर येथे एका १४ मजली इमारतीच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी कामगार हे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उद्वाहकातून वरच्या मजल्यांवर जात होते. उद्वाहक सातव्या मजल्यावर आले असता अचानक उद्वाहक खाली कोसळले. यात दोन कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी ते इमारतीत बांधकामाचे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
भिवंडी येथील मिल्लत नगर भागात बांधकामासाठी वापरण्यात येणारे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
First published on: 24-11-2022 at 01:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two laborers died when a construction excavator collapsed building bhiwandi ysh