खारेगाव येथील अलंकार टॉवरमध्ये राहणाऱ्या जॉर्ज यांना दोघांनी रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
जॉर्ज हे व्यावसायिक असून त्यांना प्रकाश घाडीगावकर व प्रियांका घाडीगावकर यांनी एका मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तुमचे पैसे दुप्पट होतील असे आमिष जॉर्ज यांना दाखविल्याने त्यांनी दोन लाख रुपये घाडीगावकर यांना दिले.
ही रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच जॉर्ज यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात घाडीगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रक्कम दुप्पट करण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक
तुमचे पैसे दुप्पट होतील असे आमिष जॉर्ज यांना दाखविल्याने त्यांनी दोन लाख रुपये घाडीगावकर यांना दिले.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 05-11-2015 at 00:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh rupees fraud in thane