भिवंडी येथील कब्रस्तानात दोन व्यक्तींची हत्या करून फरारी झालेल्या मांत्रिकास ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. अब्दुल अजीज छोटू शेख (४०) असे या आरोपी मांत्रिकाचे नाव असून, त्याचा बाबागिरी करण्याचा धंदा आहे. मुंबईतील हाजी बंदर परिसरात राहणाऱ्या या मांत्रिकाकडून पोलिसांनी लिंबू, खिळे, हळद, राख, कुंकू, काळ्या बाहुल्या,असे साहित्य जप्त केले.
भिवंडी येथील कब्रस्तानामध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. जादूटोणा करण्यासाठी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्या दोन व्यक्तींना ठार केल्याचे स्पष्ट दिसून येत होते. याप्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेमार्फत सुरू करण्यात आला होता. त्यावेळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले होते. अन्वर ऊर्फ मीनरूल ईलाही शेख (४५) शिवडी व लक्ष्मण बर्मन, भिवंडी अशी या दोन व्यक्तींची नावे स्पष्ट झाली होती. पोलिसांनी सापळा रचून मांत्रिक अब्दुल अजीज छोटू शेख यास अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा