मुंब्रा येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंब्रा भागात पिडीत ९ आणि ७ वर्षीय मुली कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी वृद्ध राहतो. मुलींना खाऊ देतो किंवा अभ्यास घेतो असे सांगून हा वृद्ध मुलींना त्यांच्या घरी नेत असे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेची माहिती मुलींनी त्यांच्या आईला दिल्यानंतर त्यांच्या आईने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वृद्धाला अटक केली आहे.