कल्याण – टिटवाळ्यात एका इसमाने रविवारी संध्याकाळी एका घरात घुसून दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. विनयभंग केल्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हा दोघींना मी शाळेमधून उचलून नेईन, अशी धमकी दिली आहे. या विनयभंग प्रकरणी एका पीडितेच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात बाल लैंगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने संबंधिता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग करणारा इसम हा कल्याण तालुक्यातील घोटसई गावातील असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. एक पीडित तरूणी १४ वर्षाची तर एक १२ वर्षाची आहे. पीडितेचे कुटुंब मजुरी करून उपजीविका करते.पीडितेने टिटवाळा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण राहत असलेल्या घराच्या परिसरात एक चायनिजचे दुकान आहे. या दुकान मालकाचा भाऊ तेथे दररोज येत असतो. त्यामुळे आपली त्याच्याशी तोंड ओळख होती. गेल्या तीन दिवसांपासून आपण शाळेत जात असताना चायनिज दुकान मालकाचा भाऊ आपण शाळेत जात असताना आपल्या पाठीमागे येत असल्याचे निदर्शनास आले.

रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता चायनिज दुकान मालकाचा, शाळेत जाताना पाठलाग करणारा भाऊ आपल्या घरात आला. त्यावेळी आपण त्याला तू घरात का आलास, असा जाब विचारला. त्यावेळी त्याने तु मला खूप आवडतेस, असे बोलून त्या इसमाने बालिकेचा हात पकडला. बालिकेने त्याचा झटकला. त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार सुरू असताना पीडितेची अल्पवयीन मावस बहिण घरात आली. तिने घरात काय सुरू आहे, असा प्रश्न केला. त्यावेळी इसमाने मावस बहिणीच्या खांद्यावर हात टाकून तिलासुद्धा तू मला खूप आवडतेस, असे बोलून तिला हाताला पकडून स्वयंपाक घरापर्यंत ओंढत नेले. आणि आम्हा दोघींना घरात घडलेला प्रकार तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना सांगितला तर तुम्हाला तुमच्या शाळेमधून उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिली. त्यानंतर तो घरातील सोफ्यावर जबरदस्तीने झोपला. तेथे त्याने त्याचे दोन्ही मोबाईल फोडले. ते उचलून घेऊन निघून गेला.या घडल्या प्रकाराने पीडित दोन्ही बहिणी घाबरल्या होत्या. एका पीडितेची आई रात्री मजुरी करून घरी आली. त्यावेळी तिने घरात घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दोन्ही पीडित बालिकांसह टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने हा गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी सुरू केला आहे.

Story img Loader