उल्हासनगर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रभाग समितीच्या दोन मुकादमांनी बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यातील चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यंदाही बांधकामाला आश्रय देण्यासाठीच लाच स्वीकारण्यात आली.

हेही वाचा- डोंबिवलीत वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या चालकांना यमराजाकडून गुलाबपुष्प; कोळसेवाडी वाहतूक विभागाची गांधीगिरी

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

उल्हासनगर शहरातील बेकायदा बांधकामांना पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेला आश्रय सर्वश्रुत आहे. अनेकदा नियमातील कामांसाठीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षात प्रभाग समिती अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रभाग समिती अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. बुधवारी अशाच प्रकारे उल्हासनगर महापालिकेतील दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभााग समिती क्रमांक तीनमधील वसंत कृष्णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सापळा लावून रंगेहात अटक केल्याची माहिती विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवली पालिकेतील २८ नगरसेवकांचा अनधिकृत घरात निवास

तक्रारदार हे राहत असलेल्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकांच्या घराच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना यात कोणतीही अडचण येऊ नये तसेच हे काम अविरत सुरू राहण्यासाठी या दोन्ही मुकादमांनी पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. बुधवार, ४ जानेवारी रोजी लोकसेवक वसंत कृष्णा फुलोरे आणि बाजीराव दामोदर बनकर यांना तक्रारदार यांच्याकडून ४ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.