कल्याण : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यासाठी चित्रफित तयार करणाऱ्या नाशिक येथील दोन तरूणांना रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत.

गेल्या दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून आरोपी राजा आणि रितेश यांनी एक चित्रफित तयार केली होती. या चित्रफितीमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. ही चित्रफित या तरूणांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून ही चित्रफित तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या चित्रफितीच्या अनुषंगाने आरोपींचा तपास सुरू केला होता.

youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Online railway ticket purchases facility unavailable for disabled
अपंगांना ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा केंव्हा मिळणार?
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Ambernath Rickshaw driver killed fatal pole road accident
अंबरनाथमध्ये जीवघेण्या खांबामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर गेल्या आठवड्यात झालेला अपघात

हेही वाचा…निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खासगी यंत्रणा – राजन विचारे

रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही चित्रण, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. ते नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. हे दोन्ही तरूण नाशिकमधून अटक केले.

हेही वाचा…ठाण्यात दोन्ही शिवसेनेत पोस्टर वॉर, उबाठाच्या पोस्टरला शिंदे सेनेकडून पोस्टरने उत्तर

या तरूणांनी कसारा रेल्वे स्थानकातील कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून बेकायदा चित्रफित तयार केल्याची कबुली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. पोलिसांनी त्यांच्या दोषारोप ठेऊन त्यांना अटक केली. असाच प्रकार यापूर्वी गुलजार शेख याने करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे. रेल्वेच्या आवारात, लोकलमध्ये कोणीही गैरकृत्य करत असेल तर त्याने १३९ किंवा ९००४४१०७३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा जवानांनी केले आहे.

Story img Loader