ठाणे : राज्य शासनाच्या सेवेतील उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि उमेश बिरारी यांची ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली असून हे दोन्ही अधिकारी महापालिकेत रूजू झाले आहेत. महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी आणि अनघा कदम यांच्याकडे असलेले शिक्षण, आरोग्य आणि सचिव हे महत्वाचे विभाग काढून ते दोन्ही नवीन उपायुक्तांकडे देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दिव्यातील निधी पेरणीतून मनसे आमदार राजू पाटलांची कोंडी

ठाणे महापालिकेत एकूण उपायुक्त दर्जाची १२ पदे आहेत. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या कोट्यातून सहा पदांवर नियुक्ती करण्यात येते. तर, उर्वरित सहा जागांवर राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्ती येणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येते. त्यामध्ये शासनाच्या सेवेतील उपायुक्त प्रशांत रोडे, तुषार पवार आणि मारुती खोडके यांची नेमणुक करण्यात आली असून तीन जागा रिक्त आहेत. त्यातील मारुती खोडके हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने चार जागा रिक्त होत्या. दरम्यान, राज्य शासनाच्या सेवेतील उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि उमेश बिरारी यांची राज्य सरकारने ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्ती केली आहे. हे दोन्ही अधिकारी ठाणे महापालिकेत रूजू झाले आहेत. त्यांच्याकडे विविध महत्वाच्या विभागांचा पदभार सोपविण्यात आला असून त्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी काढले आहेत.

हेही वाचा >>> रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ६९ लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध उल्हासनगरात गुन्हा दाखल

उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्याकडे शिक्षण व जिद्द शाळा हे विभाग देण्यात आले आहेत. हे दोन्ही विभाग यापुर्वी उपायुक्त अनघा कदम यांच्याकडे होते. कदम यांच्याकडे प्रदुषण आणि भांडारपाल विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे आरोग्य, सचिव, माहिती व जनसंपर्क आणि चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्था या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क हा विभाग उपायुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे होता. रोडे यांच्याकडे क्लस्टर सेल विभागाची जबादारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, उपायुक्त मनिष जोशी यांच्याकडे आरोग्य, सचिव हे दोन्ही महत्वाचे विभाग होते. त्यांच्याकडे परिमंडळ १ आणि स्थावर मालमत्ता विभाग कायम ठेवण्यात आले आहेत. यापुर्वी जोशी यांच्याकडे असलेला घनकचरा विभाग काढून घेऊन तो उपायुक्त तुषार पवार यांना देण्यात आला होता.