कल्याण: दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील शहाड भागात रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे चार जणांनी अपहरण करून त्याला म्हारळ येथील टेकडी भागात नेले होते. तेथे त्याला चाकुचा धाक दाखवून बेदम मारहाण करून त्याच्या जवळील १६ हजार रूपये लुटण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी पिडीत विद्यार्थी नीरज यादव याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात पोलिसांनी विनायक मदने, बब्लू जडे यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा… उड्डाणपूलाच्या कामामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यावर ‘नो पार्किंग’

दोन दिवसापूर्वी नीरज यादव अंबरनाथ येथे घरी जाण्यासाठी रात्रीच्या वेळेत रिक्षेची वाट पाहत होता. त्यावेळी दचाकीवरून चार जण आले. त्यांनी नीरजला जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसविले. त्याला म्हारळ गाव येथे नेऊन त्याला बेदम मारहाण केली होती. त्याच्याजवळील रोख रक्कम लुटली होती, असे पोलिसांनी सांगितले.