डोंबिवली, शहाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन जणांची ओळख पटलेली नाही. डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस या अज्ञात मयत व्यक्तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रात्री दहा वाजता कल्याण दिशेेने जाणाऱ्या लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.त्यानंतर एक तासाच्या अंतराने शहाड ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एक जण मृत्यू पावला. हे दोघे रेल्वे मार्गातून जात असताना त्यांचा मृत्यू झाला असण्याचा संशय पोलिसांना आहे. ओळख म्हणून या दोन्ही पादचाऱ्यांच्या जवळ काही नसल्याने पोलिसांची अडचण झाली आहे.

इतर पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता व्यक्तिची नोंद झाली आहे का. त्या माध्यमातून पोलीस या दोन मयत व्यक्तिंच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people died in a local collision near dombivli shahad amy
Show comments